पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बॉम्ब हल्ल्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २४ सप्टेंबरला झालेल्या कोझिकोड भ्रमण दरम्यान बॉम्बब्लास्ट करण्याची धमकी

Updated: Sep 28, 2016, 08:59 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बॉम्ब हल्ल्याची धमकी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २४ सप्टेंबरला झालेल्या कोझिकोड भ्रमण दरम्यान बॉम्बब्लास्ट करण्याची धमकी मिळाली होती असा पोलिसांनी खुलासा केला आहे. पंतप्रधान मोदी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार नदक्कावु पोलीस स्थानकात एका अनोळखी व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली होती. मोदींवर कोझिकोड यात्रेदरम्यान बॉम्ब टाकला जाईल अशी धमकी फोनवर देण्यात आली होती. पोलीस फोन करणाऱ्या या व्यक्तीचा शोध घेत आहे. या धमकी नंतर पंतप्रधान मोदींची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली होती. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी ७ सुरक्षा कवच बनवले गेले होते. रॅलीच्या ठिकाणी ३ किलोमीटरच्या परिसरातील संपूर्ण हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होती.