‘लिव्ह इन’मधून होणारं मूल औरसच- सुप्रीम कोर्ट

By Aparna Deshpande | Last Updated: Thursday, April 24, 2014 - 22:47

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अनेक वर्षांपासून `लिव्ह इन रिलेशन`मध्ये राहणाऱ्या जोडप्याला होणारं मूल हे औरसच असेल,` असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय. मद्रास हायकोर्टानं यासंदर्भात नोंदवलेल्या निरीक्षणास उद्य गुप्ता यांनी आव्हान दिलं होतं.
`केवळ लग्नावेळी करण्यात येणारे सर्व विधी आणि परंपरा पाळल्यानंच ते लग्न ग्राह्य धरता येतं असं नाही` हे निरीक्षण कोर्टानं नोंदविलं होतं. याला गुप्ता यांनी विरोध दर्शवला होता. यामुळं विवाह संस्थेच्या पायावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याचं गुप्ता यांनी म्हटलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टानं हा दावा फेटाळून लावला.
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बी. एस. चौहान आणि न्या. जे. सेलमेश्‍वर यांच्या खंडपीठानं या याचिकेवर सुनावणी केली. `एखादं जोडपं लग्नाशिवाय बऱ्याच काळापर्यंत पती-पत्नीप्रमाणं राहत असेल; तर ते विवाहबद्ध असल्यासारखंच आहे. त्यामुळं त्यांच्या अपत्यास अनैतिक मानता येणार नाही,` असा हाय कोर्टाच्या निरीक्षणाचा आशय असल्याचंही खंडपीठानं यावेळी स्पष्ट केलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 24, 2014 - 22:47
comments powered by Disqus