ब्राह्मोसची यशस्वी चाचणी, २९० किमीपर्यंत करणार मारा

भारताने संरक्षणाच्या बाबतीत आणखी एक झेप घेतली आहे. शनिवारी निकोबार बेटावरून ब्राह्मोस या जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. याआधी शुक्रवारीसुद्धा याची चाचणी करण्यात आली होती. दोन्ही चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. 

Updated: May 10, 2015, 05:52 PM IST
ब्राह्मोसची यशस्वी चाचणी, २९० किमीपर्यंत करणार मारा title=

नवी दिल्ली: भारताने संरक्षणाच्या बाबतीत आणखी एक झेप घेतली आहे. शनिवारी निकोबार बेटावरून ब्राह्मोस या जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. याआधी शुक्रवारीसुद्धा याची चाचणी करण्यात आली होती. दोन्ही चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राह्मोस-3 क्षेपणास्त्राची शनिवारी दुपारी 1.30 वाजता मोबाईल ऑटोनोमसने चाचणी करण्यात आली. 290 किमीची पूर्ण क्षमतेसाठी ही चाचणी करण्यात आली होती. ही ब्राह्मोस क्षेपणास्त्राची 48वी चाचणी आहे. 

सुपरसोनिक क्रुज ब्राह्मोस मिसाईलने जमिनीवरील लक्ष अजूकपणे भेदले. या मल्टी मशिन मिसाईलची मारक क्षमता 290 किमी आहे आणि वेग 2.8 मॅक आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.