बीएसएनएलची १५ जूनपासून देशात रोमिंग फ्री सेवा

बीएसएनएल ही सरकारी दूरसंचार कंपनी १५ जूनपासून नवी रोमिंग योजना लागू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांची रोमिंगमधून सुटका होऊन मोफत कॉल्स करता येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

PTI | Updated: Jun 2, 2015, 01:23 PM IST
बीएसएनएलची १५ जूनपासून  देशात रोमिंग फ्री सेवा title=

नवी दिल्ली : बीएसएनएल ही सरकारी दूरसंचार कंपनी १५ जूनपासून नवी रोमिंग योजना लागू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांची रोमिंगमधून सुटका होऊन मोफत कॉल्स करता येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

विनाशुल्क कॉलसाठी बीएसएनएल रोमिंग योजना आणणार आहे, अशी माहिती गतवर्षी होती. मात्र त्या योजनेसाठी ग्राहकाला प्रतिदिन एक रुपया शुल्क आकारले जाईल, असे सांगण्यात आले होते. आता बीएसएनएलने देशभर रोमिंग फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.

बीएसएनएलने आपल्या सर्कलमध्ये रोमिंग फ्री केले होते. आता देशात रोमिंग फ्री होणार आहे. तसेच देशात आता जुलै २०१५ पासून पोर्टेबिलीटीची सुविधा लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकाचे एकच नंबर कायम राहण्यास मदत होणार आहे. हे निर्णय मोबाईल ग्राहाकाच्या हिताचे असल्याने ग्राहक खूश आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.