पाहा... काय होणार स्वस्त; काय महाग

आता, तुम्ही हॉटेलमध्ये खायला किंवा फिरायला गेलात, तर तुमचा खर्च निश्चितच वाढणार आहे. 

Updated: Feb 28, 2015, 02:04 PM IST
पाहा... काय होणार स्वस्त; काय महाग title=

नवी दिल्ली : आता, तुम्ही हॉटेलमध्ये खायला किंवा फिरायला गेलात, तर तुमचा खर्च निश्चितच वाढणार आहे. 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत 2015-16 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी सेवाकर वाढणार असल्याचं जाहीर केलंय. सध्या, उपभोगकर्ते 12 टक्के सेवा कर भरतात. यापुढे, आता 14 टक्के सेवा कर भरावा लागणार आहे. त्यामुळे, उपभोगकर्ते वापर करीत असलेल्या विविध सेवांसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 

तसंच, यावेळी तंबाखूजन्य उत्पादनांवर कर वाढवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलंय. दिलासादायक गोष्ट म्हणजे चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. 

या गोष्टी होतील महाग... 

  • तंबाखू

  • सिगारेट

  • गुटखा

  • घर खरेदी

  • हॉटेल बिल

  • हॉस्पीटल खर्च

  • जाहिराती

  • बँकिंग सेवा आणि इतर वित्तीय सेवा

  • क्रेडीट आणि डेबिट खर्च

  • साफ-सफाई खर्च

  • इंटरनेट कॅफे

  • पॅकेजिंग

  • पोस्ट सेवा

  • टुरिस्ट सेवा

  • फोन बिल

  • वीज बिल

या गोष्टी होणार स्वस्त 

  • चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार

  • 1000 रुपयांच्यावरती असलेलं चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील

  • परदेशातून आयात केलेले सूट भाग स्वस्त होणार 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.