बस खड्ड्यात कोसळल्यानं 13 ठार

मध्यप्रदेशात रतलामजवळ एका खासगी बसला झालेल्या अपघातात 13 जण ठार, तर अनेक जण जखमी झालेत.

Updated: Oct 15, 2016, 12:03 AM IST
बस खड्ड्यात कोसळल्यानं 13 ठार title=

रतलाम : मध्यप्रदेशात रतलामजवळ एका खासगी बसला झालेल्या अपघातात 13 जण ठार, तर अनेक जण जखमी झालेत. जरोआ इथून रतलामकडे येत असताना नामली शहराजवळ एका मोठ्या खड्ड्यामध्ये ही बस कोसळली. रस्ता बांधण्यासाठी माती काढल्यामुळे रस्त्याच्या बाजुलाच हा खड्डा पडला होता.

पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्यानं त्याच्या खोलीचा चालकाला अंदाज आला नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही बस प्रचंड वेगात होती आणि चाक अचानक खड्ड्यात गेल्यामुळे पलटली. अपघातात काही जण जखमी झाले असून त्य़ांच्यावर उपचार सुरू आहेत. मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी ट्वीटरवरून अपघातातल्या मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.