पंतप्रधानांची गुगली, बाता मारून सत्ता मिळत नाही, By pretending to be secular, BJP fooling people: PM in Chhattisgarh

पंतप्रधानांची मोदींना गुगली, बाता मारून सत्ता मिळत नाही!

पंतप्रधानांची मोदींना गुगली, बाता मारून सत्ता मिळत नाही!
www.24taas.com, वृत्तसंस्था, रायपूर

नेहमी शांत असणारे आणि कोणत्याही विषयावर तात्काळ प्रतिक्रिया न देणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तोंड उघडले. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना टार्गेट केलं. मोदी केवळ विकासाच्या बाता मारत आहेत. अशा बाता मारून सत्ता मिळवता येत नाही, असा टोला पंतप्रधान यांनी मोदींना लगावला.

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदींनी अनेक जाहीर सभेत काँग्रेसला टार्गेट केलं होतं. देशाचं वाटोळं काँग्रेसने केलं आहे. पंतप्रधान काही कामाचे नाही, अशी टीका केली होती. या टीकेला पंतप्रधान सिंग यांनी त्याच भाषेत उत्तर दिलं. आमच्यावर टीक करण्याच्या नादात भाजपचे नेते देशाचा इतिहास, भूगोलही बदलून टाकत आहेत. परंतु, मोठ्या-मोठ्या बाता मारून सत्ता मिळत नसते, असा खोचक सवाल केला.

काँग्रेसल विकास हवाय. मात्र, छत्तीसगडचा विकास न होण्यामागे भाजप हे एकमेव कारण असल्याचा आरोपही पंतप्रधान सिंग यांनी यावेळी प्रचारसभेत केला. छत्तीसगड काँग्रेसनं आज पंतप्रधानांना निवडणूक रिंगणात उतरवलं. यावेळी मनमोहन सिंग यांनी जोरदार चौफेर टोलेबाजी केली. भाजपलाही चांगलाच टोला हाणला. विकासाचे खोटे दावे भाजप करत आहे, आकडे फुगवून सांगत आहे, पण अशाने सत्ता मिळत नसते. जनता हुशार आहे, ती भाजपच्या जाळ्यात अडकणार नाही, असे पंतप्रधान म्हणालेत. यावेळी मनमोहन सिंग यांनी यूपीएनं केलेल्या विकासकामांचा आढावा घेत, काँग्रेसला मत देण्याचं आवाहन त्यांनी केलं.इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 09, 2013, 21:18


comments powered by Disqus