'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला द्यावी लागणार ग्राहकांना भरपाई

तुमचा 'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. दूरसंचार ग्राहकांना ‘कॉल ड्रॉप‘साठी परतावा देण्याचा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) आदेश दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे.

PTI | Updated: Mar 2, 2016, 01:23 PM IST
'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला द्यावी लागणार ग्राहकांना भरपाई    title=

नवी दिल्ली : तुमचा 'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. दूरसंचार ग्राहकांना ‘कॉल ड्रॉप‘साठी परतावा देण्याचा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) आदेश दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे.

ट्रायच्या आदेशाविरोधात सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय) उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, न्यायलयाने ट्रायचा आदेश कायम ठेवलाय. त्यामुळे ग्राहकांना भरपाई कॉल ड्रॉपसाठी भरपाई द्यावी लागणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालेय.

एका कॉल ड्रॉपसाठी एक रुपया याप्रमाणे तीन रुपये ग्राहकांना परत द्यावेत, असे ट्रायचे आदेश होते. मात्र, सीओएआयने याला विरोध केला होता. ट्रायचा आदेश कायम ठेवत सीओएआयची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्याचवेळी दूरसंचार ग्राहकांना परतावा मिळायलाच हवा, असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटलेय.

ट्रायने निश्चित केल्याप्रमाणे १ जानेवारी, २०१६ पासून कॉल ड्रॉप भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता दूरसंचार कंपन्यांना जानेवारी महिन्यापासून कॉल ड्रॉपमुळे ग्राहकांच्या वाट्याला आलेली आर्थिक नुकसान भरपाई देणे बंधनकारक राहणार आहे.