`मनसे-शिवसेनेची मान्यता का रद्द करू नये?`

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या राजकीय पक्षांचा आक्रमकपणा त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता निर्माण झाला आहे. या दोन्ही राजकीय पक्षांची मान्यता का रद्द करू नये, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

www.24taas.com, नवी दिल्ली
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या राजकीय पक्षांचा आक्रमकपणा त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता निर्माण झाला आहे. या दोन्ही राजकीय पक्षांची मान्यता का रद्द करू नये, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
अॅड. ब्रिजेश कलापा यांनी शिवसेना आणि मनसेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ही विचारणा केलीय.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि सेनेचे उद्धव ठाकरे हे सातत्याने प्रक्षोभक भाषणे करत असतात. तसेच या भाषणांमुळे समाजात तेढ निर्माण होत असते. त्यामुळेच या पक्षांची मान्यता काढून घेतली गेली पाहिजे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणं आहे.
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या पक्षांची मान्यता का रद्द करू नये, असा प्रश्न उपस्थित करताना निवडणूक आयोगाकडून याबाबत मतही मागविले आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना मान्यतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. प्रक्षोभक भाषणांमुळे मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची मान्यता धोक्यात आली आहे.