२००० रुपयांच्या नोटांची दीड कोटींची रोकड जप्त

गोव्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.

Updated: Dec 8, 2016, 08:37 AM IST
२००० रुपयांच्या नोटांची दीड कोटींची रोकड जप्त title=

गोवा : गोव्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.

पोंडा आणि पोर्वोरिम इथं टाकलेल्या छाप्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय.

जप्त केलेल्या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या असल्याचं समजतंय. नोटाबंदीच्या घोषणेनंतर देशाच्या अनेक भागात रोख रक्कम जप्त केली जातेय.

गोव्यात सापडलेले दीड कोटी नेमके कुणाचे आहेत? आणि कशासाठी वापरले जाणार होते? हे अद्याप स्पष्ट नसून पणजी पोलीस अधिक तपास करत आहेत.