शस्त्रसंधीचं उल्लंघन: उरी सेक्टरवर गोळीबार, १ जवान शहीद

पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. श्रीनगरच्या उरीमध्ये पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झालाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 28, 2013, 11:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, श्रीनगर
पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. श्रीनगरच्या उरीमध्ये पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झालाय.
उरीच्या कमान पोस्टवर हा गोळीबार करण्यात आलाय. गेल्या १५ दिवसांपासून पाककडून शस्त्रसंधीचं सातत्यानं उल्लंघन होतंय. पाककडून बीएसएफच्या चौकींवर गोळीबार होतोय. या पार्श्वभूमीवर बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये फ्लॅग मीटिंग होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एलओसीवरील संघर्ष मिटवण्यासाठी फ्लॅग मीटिंग घेण्याची आम्ही पूर्ण तयारी करतोय. वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत एकतर कारवाई करा किंवा चर्चा करुन हे संपवा, याबाबतचा दबाव जम्मू-काश्मिर सरकारकडून केंद्रावर टाकण्यात येत होता. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री ताराचंद आणि मंत्री शामलाल शर्मा यांनी शुक्रवारी जवानांच्या चौकीची पाहणी केली आणि सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना विश्वास दर्शवला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.