केंद्राचा साखर कारखानदारांना दिलासा, ६ कोटींचे कर्ज

केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशभरातील साखर कारखान्यांना केंद्राकडून 6 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

PTI | Updated: Jun 10, 2015, 03:34 PM IST
केंद्राचा साखर कारखानदारांना दिलासा, ६ कोटींचे कर्ज title=

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशभरातील साखर कारखान्यांना केंद्राकडून 6 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

शेतकऱ्यांची देणी देण्याकरिता केंद्राकडून कारखान्यांना हे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतक-यांची देणी आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला किती निधी मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

महाराष्ट्रात सहकारी आणि खाजगी कारखाने मिळून ३ हजार ४०० कोटी रूपये शेतक-यांची देणी बाकी आहेत. दर मेट्रीक टन ८५० रूपये देण्याची मागणी महाराष्ट्र सरकारनं केली होती. 

तसंच महाराष्ट्र सरकारनंही शेतक-यांची देणी देण्यासाठी दोन हजार कोटी कर्ज देण्याची घोषणा केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक होणार आहे. या बैठकीला सहकारमंत्री चंद्रकांत पाटीलही हजर असणार आहेत. त्यात दोन हजार कोटी देण्याचा निर्णय होतो का, याकडे लक्ष लागले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.