तेलंगणा मुद्द्यावर लोकसभेत राडा

आंध्र प्रदेश राज्याचे विजन करून नवे तेलंगणा राज्य निर्माण करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार हंगामा झाला. तेलंगणा मुद्द्यावर लोकसभेत राडा पाहायला मिळाला. हाणामारीचा प्रयत्न झाला. काही खासदारांनी मिरटी स्प्रेचा वापर केला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 13, 2014, 02:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आंध्र प्रदेश राज्याचे विजन करून नवे तेलंगणा राज्य निर्माण करण्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार हंगामा झाला. तेलंगणा मुद्द्यावर लोकसभेत राडा पाहायला मिळाला. हाणामारीचा प्रयत्न झाला. काही खासदारांनी मिरटी स्प्रेचा वापर केला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
तेलंगणा विधेयक संसदेमध्ये सादर होत असताना लज्जास्पद काही खासदारांचे वर्तन पाहायला मिळालले. आंध्र प्रदेश विभाजनास विरोध करणाऱ्या खासदारांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हातून हे विधेयक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. लोकसभा अध्यक्षांपुढील जागेमध्ये तेलंगणविरोधी आणि समर्थक खासदारांमध्ये झालेल्या जोरदार धुमश्‍चक्री झाली. यावेळी धक्काबुक्कीदरम्यान एका खासदाराने मिरची पुड असलेला स्प्रे मारल्याने गोंधळाची परिस्थिती उद्‌भवली.
हा स्प्रे काही खासदारांच्या डोळ्यांत गेल्याने संसदेच्या आवारात रुग्णवाहिका बोलाविण्याची वेळ आली. या स्प्रेमुळे तीन खासदारांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तेलंगणा राज्य निर्मितीस सीमांध्र भागामधील सर्वपक्षीय खासदारांनी कडवा विरोध दर्शविला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल संसदेमधील गोंधळ पाहून अत्यंत वेदना होत असल्याचे म्हटले होते. आजही तेलंगणच्या मुद्यावरून लोकसभेमध्ये राडा पाहायला मिळाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.