'दुष्काळ निवारणासाठी दहा हजार कोटी द्या'

देशातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाची बैठक घेतली.

Updated: May 7, 2016, 07:33 PM IST
'दुष्काळ निवारणासाठी दहा हजार कोटी द्या' title=

नवी दिल्ली: देशातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाची बैठक घेतली. यामध्ये दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला होता.  यात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक या राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. 

या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या दुष्काळ निवारणासाठी मोदींकडे दहा हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाची काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं या निधीची मागणी केली आहे. 

केंद्रीय पथकानं दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर राज्यातली दुष्काळी गावांची संख्या 11 हजारांनी वाढली आहे. या गावांचाही यादीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. केंद्र सरकार दुष्काळनिवारणासाठी सर्वोतरी मदत करेल असं आश्वासन देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.