मुख्यमंत्र्यामुळेच पुणे मेट्रो रखडली - गडकरी

Last Updated: Monday, August 18, 2014 - 22:08
मुख्यमंत्र्यामुळेच पुणे मेट्रो रखडली - गडकरी

नवी दिल्ली : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार तोफ डागली... तर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचा हा हल्ला समर्थपणे परतवून लावला..

मोदी सरकार पुणे आणि नागपूर मेट्रोबाबत भेदभाव करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. राज्य मंत्रिमंडळानं नागपूरआधी पुणे मेट्रोला मान्यता दिली होती. मात्र पुणे मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारनं जाणूनबुजून मागं ठेवला असून, उद्या होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रोला मान्यता देण्यात येणार आहे.

राजकीय श्रेयवादातून नागपूर मेट्रोला आधी मंजुरी दिली जातेय, अशा शब्दांत चव्हाण यांनी गडकरींचे नाव न घेता टीका केली... तर पुणे मेट्रोचा प्रस्ताव रखडण्याला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, असा टोला गडकरींनी हाणला.

पुणे मेट्रो मंजुरीसाठी केंद्राने 10 अटी घातल्या होत्या. पण पुणे महापालिका आणि राज्य सरकारने याबाबत पाठपुरावा केला नाही. नागपूरने त्याची पूर्तता केली, असा खुलासा गडकरींनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी याविषयात कधीच विचारणा केली नाही. ते त्यांच्या कामाच्या गतीबाबत किती प्रसिद्ध आहेत, हे आपण जाणताच... असा शालजोडीतला टोलाही गडकरींनी हाणला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Monday, August 18, 2014 - 22:07
comments powered by Disqus