नक्षलवाद्यांच्या हल्ल्यावरून काँग्रेस भाजपमध्ये वाद

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, May 26, 2013 - 22:23

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
छत्तीसगडमधल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यावरून राजकारण तापलंय. काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीला पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती असा आरोप काँग्रेसनं केलाय. तर भाजपनं काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.
हल्ल्याची जबाबदारी छत्तीगड सरकारनं घ्यावी अशी मागणी कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी केलीय. तर भाजपनं काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी या प्रकरणात भाजपा सरकारला लक्ष्य केलंय. या हल्ल्यात जखमी झालेले सर्व जण लवकरात लवकर बरे व्हावी अशी मी प्रार्थना करतो. छत्तीसगड सरकारनं या हल्ल्याची जबाबदारी घ्यायला हवी. काँग्रेस नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात सरकार अपयशी ठरलंय. अशी टीका दिग्विजय सिंह यांनी केलीय.
तर हा हल्ला ही अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचे कोणीही राजकारण करु नये असं आवाहन विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, May 26, 2013 - 22:23
comments powered by Disqus