विरोधीपदासाठी काँग्रेस तर शिवीगाळ प्रकरणी तृणमूल आक्रमक

काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केलीय. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली.

Updated: Jul 9, 2014, 12:18 PM IST
विरोधीपदासाठी काँग्रेस तर शिवीगाळ प्रकरणी तृणमूल आक्रमक title=

नवी दिल्ली : काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केलीय. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली.

यासाठी आज काँग्रेस नेत्यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. कायद्यानुसार काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशी मागणी यावेळी काँग्रेस नेत्यांनी केलीय. यावेळी मल्लिकार्जून खरगे, ज्योतिरादित्य सिंधिया, अमरिंदर सिंग उपस्थित होते.

तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. काल भाजप आणि टीएमसीच्या खासदारांमध्ये अचानक बाचाबाची झाली.

रेल्वे बजेट सादर होत असताना एका भाजप खासदारानं दारू पिऊन शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप टीएमसीच्या महिला खासदार काकोली घोष यांनी केला होता. भाजपा खासदारांच्या या वागणुकीच्या विरोधात तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आज निदर्शनं केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.