काँग्रेस नेत्याचा प्रताप, चालवत होता हायप्रोफाइल सेक्स रॅकेट

हल्दवानीमध्ये उघडकीस आलेले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली लामाचौड निवासी काँग्रेसचा नेता राज उर्फ राजी आणि दोन महिलांना अटक करण्यात आले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 1, 2014, 01:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, हल्दवानी
हल्दवानीमध्ये उघडकीस आलेले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली उत्तरखंडातील लामाचौड निवासी काँग्रेसचा नेता राज उर्फ राजी आणि दोन महिलांना अटक करण्यात आले. त्यांना मंगळवारी कोर्टासमोर सादर करण्यात आले. या तिघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सेक्स रॅकेटमधून मुक्त करण्यात आलेल्या दोन तरूणींना काउन्सिलिंगनंतर नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.
दोन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता, असे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही मुलींचा ब्रेन वॉश करण्यात आला होता.
खोटे ग्राहक म्हणून पोलिसांनी पकडले सेक्स रॅकेट
हल्दवानी पोलिसांनी बनावट ग्राहक बनून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांना आणि दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला आणि तरूणींची चौकशी केल्यानंतर मुली पुरविणाऱ्या दलालांना अटक करण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.