अभिनेत्री नगमासोबत काँग्रेस आमदाराची गैरवर्तणूक

Last Updated: Monday, March 24, 2014 - 09:20

www.zee24taas.com, झी मीडिया, मेरठ
सध्या राजकारणात चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री नगमासोबत छेडछाडी झाल्याची माहिती येतेय. सूत्रांनुसार, नगमा मेरठमध्ये काँग्रेसची उमेदवार आहे.
रविवारी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान तेथिल स्थानिक काँग्रेस आमदार गजराज सिंग यांनी नगमासोबत गैरवर्तणूक केल्याचं कळतंय. मात्र नगमानं छेडछाडीच्या घटनेला नकार दिलायं.
सूत्रांनुसार, पोलीस आणि समर्थकांच्या गर्दीत नगमा जात असताना, काँग्रेस आमादार गजराज सिंग यांनी नगमाला हस्तांदोलन करताना दिसले. मात्र नगमाने लगेचच गजराज सिंग यांचा हात झटकला.
या घटनेची संपूर्ण शहरात चर्चा होतेय. निवडणुकीच्या प्रचारात नगमा चौधरी चरण सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालत असताना, आमदार गजराज सिंग यांनी नगमाच्या चेहऱ्यावर हात लावून कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून नगमानं गजराज सिंग यांचा हात झटकला.

हा सगळा प्रकार पोलिसांच्या हजेरीतच झाला. मात्र जेव्हा नगमाला काँग्रेस आमदार यांच्या वर्तणुकीबद्दल विचारले. तेव्हा तिने छेडछाडीला नकार दिला.
काँग्रेस आमदार गजराज सिंग यांना विचारलं असता, आपण निरपराध असल्याचं त्यांनी सांगितलं. मेरठमधून पहिल्यांदा काँग्रेसतर्फे नगमा निवडणूक लढणार आहे. शनिवारी नगमा आपल्या समर्थकांसोबत निवडणूक अर्ज भरण्यास आली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 23, 2014 - 16:18
comments powered by Disqus