'योगीं'च्या निवडीनं विरोधकांची भाजपवर टीका

योगी आदित्यनाथ यांच्या निवडीनंतर विरोधीपक्षांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केलीय. आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर जर जातीय सलोखा बिघडला, तर उत्तर प्रदेशात रस्त्यावर उतरू असा इशारा सपानं दिला आहे. काँग्रेसनंही या निर्णायवर टीका केली आहे. सीपीएमनं मात्र या निवडीविषयी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.

Updated: Mar 19, 2017, 09:41 AM IST
'योगीं'च्या निवडीनं विरोधकांची भाजपवर टीका title=

लखनऊ : योगी आदित्यनाथ यांच्या निवडीनंतर विरोधीपक्षांनी भाजपवर टीका करायला सुरूवात केलीय. आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर जर जातीय सलोखा बिघडला, तर उत्तर प्रदेशात रस्त्यावर उतरू असा इशारा सपानं दिला आहे. काँग्रेसनंही या निर्णायवर टीका केली आहे. सीपीएमनं मात्र या निवडीविषयी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.

लखनऊमध्ये पार पडलेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीत योगी आदित्यनाथ यांच्या मागणीनुसार लखनऊचे महापौर दिनेश शर्मा आणि उत्तरप्रदेश भाजपचे केशवप्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्री करावं असं ठरवण्यात आलं. शनिवारी रात्री नायडू, उत्तरप्रदेशचे प्रभारी ओम माथूर यांच्यासह योगी आदित्यनाथ, केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेचा दावा योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांकडे केला.