गायीला व्हायचंय इंजीनिअर! परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं

आता एक आश्चर्यजनक बातमी... आता गाईला इंजीनिअर व्हायचंय... हे आम्ही नाही म्हणत तर जम्मू काश्मीरमध्ये चक्क गाईच्या नावानं हॉल तिकीट जारी करण्यात आलंय. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षेसाठी हे हॉल तिकीट जारी करण्यात आलंय.

Updated: May 3, 2015, 04:24 PM IST
गायीला व्हायचंय इंजीनिअर! परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं title=

श्रीनगर: आता एक आश्चर्यजनक बातमी... आता गाईला इंजीनिअर व्हायचंय... हे आम्ही नाही म्हणत तर जम्मू काश्मीरमध्ये चक्क गाईच्या नावानं हॉल तिकीट जारी करण्यात आलंय. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षेसाठी हे हॉल तिकीट जारी करण्यात आलंय.

बोर्ड ऑफ प्रोफेशनल एन्ट्रन्स एक्जामिनेशंस अर्थात बीओपीईईनं पॉलिटेक्निक डिप्लोमा परीक्षेसाठी गायीच्या नावानं हॉल तिकीट जारी केलंय. काचिर गाव अर्थात तांबड्या गायीच्या नावानं हे हॉल तिकीट जारी करण्यात आलंय. ही गाय गूरा दंड म्हणजेच लाल सांडची मुलगी असल्याचं या हॉलतिकीटवर छापण्यात आलंय.

— Junaid Azim Mattu (@Junaid_Mattu) May 2, 2015

१० मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी गाईला बेमिना इथलं गर्व्हमेंट डिग्री कॉलेज हे सेंटर देण्यात आलंय. विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते जुनेद अजीम मट्टू यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर या हॉल तिकीटचा फोटो टाकल्यानंतर हा सारा प्रकार उघड झालाय.

बीओपीईईनं सर्व शहानिशा करुन घेऊनच गाईला परीक्षा क्रमांक आणि हॉल तिकीट दिल्याचं मट्टू यांनी म्हटलंय. आपल्याकडे गाईला देण्यात आलेलं तात्पुरतं प्रवेशपत्र आणि काचिर गावनं बीओपीईईला अदा केलेल्या रक्कमेची पोचपावती असल्याचा दावा मट्टू यांनी केलाय. तर राज्य सरकारच्या सांगण्यावरुन बीओपीईईनं गाईचं हॉलतिकीट वेबसाईटवरुन हटवल्याचा आरोप मट्टू यांनी केलाय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.