साणंदमधील मजूर आणि शिपाईही आहेत कोट्याधीश

देशात एक असे ठिकाण आहे जेथे कंपनीत काम करणारे, मजूर, शिपाई, सिक्युरिटी गार्डही करोडपति आहेत. अहमदाबादमधील साणंद येथील या मजूर,शिपायांना साधारण वेतन मिळते मात्र त्यानंतरही ते करोडपती आहेत. 

Updated: Dec 8, 2015, 01:58 PM IST
साणंदमधील मजूर आणि शिपाईही आहेत कोट्याधीश  title=

अहमदाबाद : देशात एक असे ठिकाण आहे जेथे कंपनीत काम करणारे, मजूर, शिपाई, सिक्युरिटी गार्डही करोडपति आहेत. अहमदाबादमधील साणंद येथील या मजूर,शिपायांना साधारण वेतन मिळते मात्र त्यानंतरही ते करोडपती आहेत. 

गेल्या काही वर्षांत गुजरात सरकारने भूअधिग्रहण कायद्यांतर्गत चार हजार हेक्टर जमिनी घेतल्या. या जमिनींच्या बदली जमीन मालकांना करोडो रुपये देण्यात आले. यामुळेच हे सर्व मालामाल झालेत. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार रविराज फोइल्स लिमिटेड कंपनीमध्ये काम करणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांपैकी तब्बल १५० कर्मचाऱ्यांचा बँक बॅलन्स एक कोटीहूनही अधिक आहे.
इतका बँक बॅलन्स असूनही हे करोडपति कर्मचारी नऊ हजार ते २० हजार रुपयांपर्यतची नोकरी करत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.