आंध्र प्रदेशला एक हजार कोटींची मदत जाहीर

 हुडहुड वादळाचा तडाखा बसलेल्या आंध्र प्रदेशला पंतप्रधानांकडून एक हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली.तर मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख देण्यात येणार आहे. हुडहुड वादळाचा तडाखा बसलेल्या भागाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौरा केला. त्यांच्यासोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू त्यांच्यासोबत होते.

Updated: Oct 14, 2014, 05:14 PM IST
आंध्र प्रदेशला एक हजार कोटींची मदत जाहीर title=

हैदराबाद : हुडहुड वादळाचा तडाखा बसलेल्या आंध्र प्रदेशला पंतप्रधानांकडून एक हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली. तर मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख देण्यात येणार आहे. 

हुडहुड वादळाचा तडाखा बसलेल्या भागाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौरा केला. त्यांच्यासोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू त्यांच्यासोबत होते.

आंध्र प्रदेश आणि विशाखापट्टणमला हुडहुड वादळाचा मोठा फटका बसलाय. वादळात आत्तापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय. पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशसाठी एक हजार कोटी रुपयांचे अंतरिम पॅकेज जाहीर केलंय. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केलीय.

या संकटसमयी सारा देश आंध्र प्रदेशच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली. आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम, विजयनगरम आणि श्रीकाकुलम जिल्ह्यांना वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. वादळाचा जोर ओसरल्यानंतर आता आंध्र आणि ओडिशामधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी अनेकांचे संसार हुडहुडनं उध्वस्त केलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.