देशात लुटारू वधूंचा सुळसुळाट!

जर तुम्ही लग्नाळू असाल आणि तुम्हाला जर कुणी नव्या संसाराची स्वप्नं दाखवत असेल, तर सावधान1 कारण भारतातल्या अनेक शहरांत सध्या लुटारू वधुंची सुळसुळाट झाला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 5, 2013, 04:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
जर तुम्ही लग्नाळू असाल आणि तुम्हाला जर कुणी नव्या संसाराची स्वप्नं दाखवत असेल, तर सावधान1 कारण भारतातल्या अनेक शहरांत सध्या लुटारू वधुंची सुळसुळाट झाला आहे. मध्य प्रदेश तसंच राजस्थानातही या लुटारू वधूंनी कांड केली आहेत.
ही टोळी पुरुषांना फक्त स्थळच सुचवत नाही, तर त्यांचं एका सुंदर मुलीशी विधीवत लग्नही लावून देते. ही वधू सासरच्या व्यक्तींची सेवा करते, सगळ्यांची मनं जिंकते आणि त्यानंतर ही नवपरिणित वधू एक दिवस सर्वांना गुंगारा देऊन घरातील सर्व दागिने आणि मौल्यवान वस्तून घेऊन पोबारा करते. अशा अनेक मुलींची ही लुटारू टोळी आहे. सुमारे १२ ते १५ मुलींची ही टोळी आहे.
या टोळीचा प्रमुख मध्य प्रदेशात असल्याचं म्हटलं जात आहे. अनेक विवाहेच्छुक पुरुषांकडून ५० हजार ते २ लाख रुपये घेत या टोळीतील माणसं गिऱ्हाइकांना फसवतात. नवरी शोधणाऱ्या युवकांना सुंदर तरुणींचं आमिष दाखवून त्यांचं लग्न लावून दिलं जातं, आणि त्यानंतर या लुटारू वधू सासरचं घर लुटून पळून जातात. या लुटूचे तीन वाटे होत असून एक या टोळीच्या प्रमुकाला दिला जातो, एक गिऱ्हाइक शोधून आणलेल्या व्यक्तीला दिला जातो आणि तिसरा त्या लुटारू वधूला पुरवला जातो. सध्या मध्य प्रदेशातील आणि राजस्थानमधील पोलीस या लुटारू वधूंच्या टोळीला शोधत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.