डॉन दाऊदच्या तीन ठिकाणांची माहिती

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, July 31, 2013 - 11:47

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मंगळवारी ६००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. यातमध्ये कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम यांच्या कारनाम्याची तीन ठिकाणे नमुद करण्यात आली आहेत. तर दोन वेळा त्यांने बुकींशी संपर्क केल्याचे स्पष्ट म्हटलं आहे. दोनदा तसे रेकॉर्ड करण्यात आल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी हे आरोपपत्र दाखल केले आहे. दाऊदच्या संभाषणावरून तो तिन ठिकाणाहूंन आपली सूत्रे हलवत होता. यातील दोन ठाकाणे ही पाकिस्तानमधील कराची आहेत तर तिसरे हे राजधानी इस्लामाबाद. पोलिसांनी दाऊदचे दोन पत्तेही या चार्जशीट दिले आहेत. पोलिसांनी सुरूवातीलाच दाऊदच्या नावाचा उल्लेख केलाय. या प्रकरणातील दाऊत हा मुख्यसूत्रधार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दाऊद इब्राहिम याचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आलेय. काही संभाषणावरून दाऊद या बुकींच्या संपर्कात होता. दाऊदने बुकी रमेश व्यास याला फोन केला होता. यावेळी दाऊदने व्यासला धमकीही दिली होती. तू आका आणि डॉक्टर प्रमाणे इमानदार रहा. यातील आका याचा संदर्भ सलमान आणि डॉक्टर याचा अर्ध दाऊदचा सहयोगी जावेद चौटानी यांच्यासाठी आहे. हे दोघे पाकिस्तानमधून आपली सूत्रे हलवत आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे.
दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या संभाषणात दाऊदबरोबर जावेद चौटानी बोलला. टिंकू मंडीच्या माध्यमातून जावेदने दाऊदबरोबर संपर्क साधला. दरम्यान, संभाषणातील दाऊदच्या आवाजाला सीएफएसएल पुष्टि दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 31, 2013 - 11:45
comments powered by Disqus