भारतात तणाव निर्माण करायचा दाऊदचा प्रयत्न ?

2002 च्या गुजरात दंगलीमध्ये आरोप असलेल्या हिंदू नेत्यांना मारणाऱ्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं मोठी रक्कम आणि दक्षिण आफ्रिकेत नोकरी देण्याचा प्रस्ताव दिला होता.

Updated: May 8, 2016, 05:58 PM IST
भारतात तणाव निर्माण करायचा दाऊदचा प्रयत्न ? title=

मुंबई: 2002 च्या गुजरात दंगलीमध्ये आरोप असलेल्या हिंदू नेत्यांना मारणाऱ्यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं मोठी रक्कम आणि दक्षिण आफ्रिकेत नोकरी देण्याचा प्रस्ताव दिला होता. इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. 

भारतामध्ये सांप्रदायिकता वाढवून देशातलं वातावरण खराब करण्याचा दाऊदचं प्लॅनिंग होतं, त्यामुळे त्यानं ही प्रलोभनं दिली होती. धार्मिक नेते, चर्च आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांवर हल्ले करून दाऊदला भारतात तणाव वाढवायचा होता, असंही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 

हिंदू नेत्यांवर हल्ला करण्याचा कट करणाऱ्या 10 जणांविरोधात अहमदाबादच्या कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. डी कंपनीचे शूटरनी 2 नोव्हेंबर 2015 ला शिरीष बंगाली आणि प्रग्नेश मिस्त्री या दोन नेत्यांची हत्या झाली होती. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनच्या फाशीच्या बदल्यासाठी या नेत्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

डी कंपनीचे दोन सदस्य जावेद चिकना आणि जाहिद मियां उर्फ जाओ हे या दोन्ही नेत्यांच्या हत्येचे मास्टरमाईंड असल्याचं एनआयएच्या तपासात समोर आलं आहे.