देशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू

देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

PTI | Updated: May 28, 2015, 10:25 AM IST
देशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू title=

नवी दिल्ली: देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

मृत्यू झालेल्या लोकांमध्ये बांधकाम मजूर, वृद्ध आणि बेघर यांची सर्वाधिक संख्या आहे. केवळ आंध्र प्रदेश एक हजार २० तर तेलंगणामध्ये ३४० लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. तेलंगणात ४८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीये. उत्तर भारतही वाढत्या तापमानानं हैराण झालाय. 

उत्तर प्रदेशही चांगलाच तापलाय. अलाहाबाद सारख्या शहरात ४७ अंश तापमान आहे. तर आग्रामध्ये ४६ अंश तापमान आहे. काही ठिकाणी तर कडक उन्हामुळं रस्तावरील डांबर वितळल्याचं चित्र पहायलं मिळतंय. उष्माघाताचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा पुरेश नसल्याचं दिसून येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.