उत्तर भारतात धुक्यामुळे रेल्वे, विमान वाहतुकीवर मोठा परिणाम

उत्तर भारतात गेल्या आठवडयाभरापासून पसरलेल्या धुक्याच्या साम्राज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. आज दिवसभरात तब्बल 94 गाड्या उशिरानं धावत होत्या. तर 15 गाड्यांच्या वेळापत्रका मोठे बदल करण्यात आले. 

Updated: Dec 8, 2016, 08:54 PM IST
उत्तर भारतात धुक्यामुळे रेल्वे, विमान वाहतुकीवर मोठा परिणाम title=

नवी दिल्ली : उत्तर भारतात गेल्या आठवडयाभरापासून पसरलेल्या धुक्याच्या साम्राज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. आज दिवसभरात तब्बल 94 गाड्या उशिरानं धावत होत्या. तर 15 गाड्यांच्या वेळापत्रका मोठे बदल करण्यात आले. 

दिल्लीतून बाहेर जाणाऱ्या आणि दिल्लीत उतरणाऱ्या सगळ्या विमानांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.  दिल्ली आणि परिसरात मोठ्याप्रमाणात तापामानातही घट झाली आहे. 

दिल्ली, लखनऊ, पाटाणा, जयपूर, भोपाळ या शहरांमध्ये पारा 15 अंशांच्या खाली गेलाय. त्यामुळे थंडी आणि धुक्याच्या साम्राज्यामुळे संपूर्ण उत्तर भारतातल्या सामान्य जनजीवनाचा वेग कमालाचा मंदावला आहे.