दिल्ली गँगरेप : आरोपीला मारहाण आणि विषप्रयोग!

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, May 16, 2013 - 08:43

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली गँगरेप प्रकरणातील एका आरोपी विनय शर्मा याला तुरुंगातील इतर कैद्यांनी मारहाण केलीय तसंच त्याच्यावर गेल्या महिनाभरापासून विषप्रयोगही होतोय, असा दावा त्याच्या वकिलांनी केलाय. विनची प्रकृती गंभीर असून त्याला हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
नुकतंच, याच प्रकरणातील आरोपी राम सिंग यानं तिहार जेलमध्ये शर्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता विनय शर्मा याला मारहाण तसंच विषप्रयोग झाल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय. तुरुंगातील कैद्यांनी शर्माला बेदम मारहाण केलीय त्यामुळे त्याच्या छातीत दुखत आहे. तसंच गेल्या महिनाभरापासून त्याला जेवणातून स्लो पॉयझन दिलं जात आहे. त्यामुळे विनयनं रक्ताच्या उलट्या केल्या तसंच त्याला तापही आहे, असं विनयचे वकिल ए. पी. सिंग यांनी कोर्टात म्हटलंय.

यानंतर आरोपीला योग्य आरोग्यसुविधा पुरवण्यात याव्यात, असे आदेश विशेष कोर्टाने तिहार तुरुंग अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, तिहार जेलचे प्रवक्ते सुनील कुमार गुप्ता यांनी मात्र आरोपीला जेवणातून विष देण्यात आल्याचा आरोप फेटाळलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 16, 2013 - 08:42
comments powered by Disqus