…आणि रस्ता दुधानं धुवून निघाला!

 पूर्व दिल्लीमध्ये राष्ट्रीय महामार्ग NH 24 वर बुधवारी सकाळी रस्त्यावरच दुधाचे पाट वाहू लागले... मदर डेअरीचा एक दूधानं भरलेला टँकर रस्त्यावरच उलटल्यानं संपूर्ण रस्ताभर दूध पसरलेलं दिसलं.

Updated: Jun 25, 2014, 03:45 PM IST
…आणि रस्ता दुधानं धुवून निघाला! title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : पूर्व दिल्लीमध्ये राष्ट्रीय महामार्ग NH 24 वर बुधवारी सकाळी रस्त्यावरच दुधाचे पाट वाहू लागले... मदर डेअरीचा एक दूधानं भरलेला टँकर रस्त्यावरच उलटल्यानं संपूर्ण रस्ताभर दूध पसरलेलं दिसलं.

गाजीपूरहून मयूर विहारकडे निघालेली गाडी सुस्साट सुटली होती. पण, मध्येच या दुधानं भरलेल्या गाडीला अपघात झाला आणि हा ट्रक उलटला. ड्रायव्हरनं अचानक गाडी डिव्हायडरवर चढवला होता. त्यामुळे गाडी उलटली होती. हा अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर गाडी तिथंच टाकून फरार झाला होता.  

रस्त्याभर पसरलेलं दूध नाल्यापर्यंत वाहून गेलं... रस्त्यावरच्या छोट्या छोट्या मुलांनी बाटल्यांमध्ये दूध भरून घेऊन गेले... पण, यामुळे जवळजवळ दोन तास एन एच 24 वर ट्रॅफिक जाम झालं होतं.

पोलिसांनी अपघात झालेला ट्रक ताब्यात घेतलाय. फरार ड्रायव्हरचा शोध अद्याप सुरू आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.