केजरीवाल, किरण बेदींनी भरला उमेदवारी अर्ज

दिल्ली विधासभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आजचा दिवस शेवटचा असताना माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी उमेदवारी अर्ज भरला.

Updated: Jan 21, 2015, 02:49 PM IST
केजरीवाल, किरण बेदींनी भरला उमेदवारी अर्ज title=

नवी दिल्ली : दिल्ली विधासभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आजचा दिवस शेवटचा असताना माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी उमेदवारी अर्ज भरला.

अरविंद केजरीवाल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर रॅली काढून आपमधून भाजपवासी झालेल्या किरण बेदी यांनी मेदवारी अर्ज भरला. यावेळी भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून तर किरण बेदी कृष्णानगरमधून ही निवडणूक लढवणार आहेत. 

काँग्रेसकडून अजय माकन यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला. ते सदर बाजार येथून निवडणूक लढवत आहेत. केजरीवाल यांनी किरण बेदी यांना चर्चेचे खुले आव्हान दिले. मात्र, आपण विधान सभेत यावर बोलू असे सांगून चर्चेला फाटा दिला. तर आपला लढा हा कोणत्याही एका पक्षाविरोधात नसून भ्रष्टाचार व महागाईविरोधात आहे. ज्याप्रमाणे दिल्लीतील जनतेने गेल्या निवडणुकीत आमच्यावर विश्वास ठेवला, तसाच तो यावेळीही ठेवावा असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

दरम्यान, किरण बेदी आणि केजरीवाल हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका काँग्रेस नेते अजय माकन यांनी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.