दिल्लीत ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात

दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. दिल्ली विधानसभाच्या निवडणुकीच्या रणांगणात तीन राजकीय पक्षांचा समावेश आहे.

Updated: Feb 7, 2015, 08:54 AM IST
दिल्लीत ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात title=

नवी दिल्ली  : दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. दिल्ली विधानसभाच्या निवडणुकीच्या रणांगणात तीन राजकीय पक्षांचा समावेश आहे.

आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचा यात समावेश आहे. मतमोजणी १० फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

आम आदमी पार्टीने आपले नेते अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला आहे. तर भारतीय जनता पार्टीने केजरीवाल यांच्या माजी सहकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलं आहे.

काँग्रेसने देखिल मागील निवडणुकीचा अनुभव लक्षठात घेऊन अजय माकन यांच्याकडे निवडणुकीची कमान सोपवली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.