दिल्लीच्या चायवाल्याने सुरु केली ऑनलाईन पेमेंटची सुविधा

पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झालाय. एटीएम आणि बँकांमध्ये मोठ्या रांगा असल्यानं पैशांचे दैनंदिन व्यवहार कसे करावे असा प्रश्न सामान्यांना पडलाय. 

Updated: Nov 13, 2016, 04:35 PM IST
दिल्लीच्या चायवाल्याने सुरु केली ऑनलाईन पेमेंटची सुविधा title=

नवी दिल्ली : पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झालाय. एटीएम आणि बँकांमध्ये मोठ्या रांगा असल्यानं पैशांचे दैनंदिन व्यवहार कसे करावे असा प्रश्न सामान्यांना पडलाय. 

याच समस्येवर दिल्लीतल्या एका चहा विक्रेत्यानं तोडगा काढलाय. या चहा विक्रेत्यानं चहाच्या बदल्यात ग्राहकांकडून ऑनलाईन पैसे स्वीकारण्यास सुरुवात केलीय. 

या आयडियाच्या कल्पनेनंतर या चहा स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होतेय. त्यांनी या चहा विक्रेत्याच्या या आयडियाच्या कल्पनेचे स्वागत केलंय. अशाप्रकारे चहाचे सात रुपये ग्राहकांकडून ऑनलाईन स्वीकारुन मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत असल्याचं चहा विक्रेता मोनू यानं सांगितलंय.