नोटबंदीनंतर सरकारचा १०० च्या नोटेसंदर्भात मोठा निर्णय

 रिझर्व बँक ऑफ इंडिया लवकरच १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहेत. या नोटा इनसेट लेटर शिवाय आणि मोठ्या ओळख चिन्हांच्या असणार आहेत. रिझर्व बँक लवकरच महात्मा गांधीच्या श्रृंखलाच्या २००५ च्या नोटा चलनात आणणार आहेत. 

Updated: Dec 6, 2016, 07:28 PM IST
नोटबंदीनंतर सरकारचा १०० च्या नोटेसंदर्भात मोठा निर्णय  title=

नवी दिल्ली :  रिझर्व बँक ऑफ इंडिया लवकरच १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहेत. या नोटा इनसेट लेटर शिवाय आणि मोठ्या ओळख चिन्हांच्या असणार आहेत. रिझर्व बँक लवकरच महात्मा गांधीच्या श्रृंखलाच्या २००५ च्या नोटा चलनात आणणार आहेत. 

या नव्या नोटांवर नवे गर्व्हनर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. तसेच विना इनसेट लेटरसह २०१६च्या मुद्रणासह जारीी करण्यात येणार आहे. 

या नोटांचे डिझाइन महात्मा गांधींची श्रृंखला २००५ प्रमाणे असणार आहे. रिझर्व बँकने म्हटले आहे यापूर्वीच्या जुन्या १०० च्या नोटा बाजारात चालणार आहेत. 

२० आणि ५० च्याही नव्या नोटा येणार 

यापूर्वी आरबीआयने २० आणि ५० नव्या नोटा चलनात आणणार असल्याचे आदेश दिले आहे. या नोटा महात्मा गांधी सिरीजच्या २००५ नोटा असणार आहेत. यात नोटांवर नवे गर्व्हनर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. तसेच विना इनसेट लेटरसह २०१६च्या मुद्रणासह जारी करण्यात येणार आहे. 

२० रुपयांच्या नव्या नोटांच्या दोन क्रमांक पॅनलवर इनसेट लेटर L लिहिण्यात येणार आहे. तर ५० रुपयांची नोटांवर दोन्ही पॅनलवर इनसेट लेटरला हटविण्यात आले आहे. यासोबत जुन्या २० आणि ५० च्या नोटा चालणार आहेत.