भगवे कपडे घालून जीन्स विकणार - दिग्विजयसिंह

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

Updated: Sep 14, 2016, 03:39 PM IST
भगवे कपडे घालून जीन्स विकणार - दिग्विजयसिंह  title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

दिग्विजय म्हणाले, 'आता भगवे कपडे घालून बाबा रामदेव जीन्स आणि बूट विकताना दिसणार आहेत'.

आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आरोग्य, फार्मा आणि किराणापाठापोठ आता योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीने स्वदेशी जीन्स सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

पतंजली आयुर्वेद कंपनीने नुकतेच जीन्स बाजारात सादर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

रामदेवबाबा भगवी वस्त्रे घालून जीन्स विकणार आहेत. आखाडा परिषद आणि साधूसंत रामदेवबाबांकडून होत असलेला भगव्या वस्त्राचा हा अपमान किती दिवस सहन करणार आहेत, असं टवीट  दिग्विजयसिंह यांनी केले आहे.

दिग्विजयसिंह यांनी असंही टवीट केलं आहे की, दुसरीकडे रामदेवबाबा आणि बाळकृष्ण हे खोऱ्याने पैसे ओढत आहेत, आणि देशात सध्या कष्टाने आणि प्रामाणिकपणे पैसे कमाविणाऱ्या व्यावसायिकांवर छापे पडत आहेत.