आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवर सूट

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 0.75% सूट देण्यात येणार आहे.

Updated: Dec 12, 2016, 09:38 PM IST
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवर सूट  title=

नवी दिल्ली : आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 0.75% सूट देण्यात येणार आहे. डेबिट/क्रेडिट कार्ड, मोबाईल वॉलेट, प्रिपेड लॉयल्टी कार्डच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलचे व्यवहार दिल्यास ही सूट मिळणार आहे.

पेट्रोल पंपावर डिजीटल व्यवहार केल्यास डिस्काऊंटचे पैसे पुढच्या तीन दिवसांमध्ये ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं डिजीटल पेमेंट करणाऱ्यांना विशेष सूट द्यायचा निर्णय घेतला.