चेहऱ्याच्या रंगावरून पतीनं आपल्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केले

मध्येप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील एका पतीनं पत्नीच्या रंगावरून  तिचा मानसिक छळ सुरु केला. त्या महिलेनं पतीच्या या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Updated: Sep 15, 2016, 05:32 PM IST
चेहऱ्याच्या रंगावरून पतीनं आपल्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केले title=

झाबुआ : मध्येप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील एका पतीनं पत्नीच्या रंगावरून  तिचा मानसिक छळ सुरु केला. त्या महिलेनं पतीच्या या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

'मी चांगली दिसणारी गोरी पत्नी आणणार आहे' असं म्हणून तो नेहमी तिला मानसिक त्रास द्यायचा. या घटनेनंतर पोलिसांनी त्या पतिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अन्नुबाई असं त्या महिलेचं नाव असून, पोलिसांनी केलेल्या तपासानुसार ही आत्महत्या मानसिक छळामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.