'एडस'च्या भीतीनं डॉक्टरांनी गर्भवती महिलेला मरण्यासाठी सोडलं!

एका गर्भवती महिलेला 'एडस्'ची लागण झालीय हे समजल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी हात सरळ सरळ वर केले... आणि तिला तिथेच टेबलवर टाकून डॉक्टरांनी तिथून पळ काढला.

Updated: Jun 27, 2015, 03:57 PM IST
'एडस'च्या भीतीनं डॉक्टरांनी गर्भवती महिलेला मरण्यासाठी सोडलं! title=

सिरसा : एका गर्भवती महिलेला 'एडस्'ची लागण झालीय हे समजल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी हात सरळ सरळ वर केले... आणि तिला तिथेच टेबलवर टाकून डॉक्टरांनी तिथून पळ काढला.

 

ही घटना घडलीय हरियाणातील सिरसा या गावात... प्रसव पीडेनं विव्हळत असणारी ही महिलेला तिच्या पतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं होतं. पण, एक रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी या महिलेला 'एडस' असल्याचं सांगितलं आणि तिच्यावर उपचार करण्यास सरळ सरळ नकार दिला. तिला ऑपरेशन थेटरमध्येच सोडून निघून गेले. तिला हॉस्पिटलमधल्या नर्स आणि कंपाऊंडरनेही अपमानास्पद वागणूक दिली. 

 

घाबरलेल्या गीताला तीच्या पतीने खाजगी रूग्णालयात दाखल केलं जिथं तीला एड्स नसल्याचं निदान झालं. यानंतर तीच्यावर उपचार सुरू झाले. गीताने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत.

 

महत्त्वाचं म्हणजे, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पहिल्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आला तरी कोणत्याही रुग्णाला 'एडस'चा रुग्ण म्हणून घोषित केलं जाऊ शकतं नाही... परंतु, या डॉक्टरांनी गीताचा रिपोर्ट परत एकदा पडताळूनही पाहिला नाही. या घटनेनंतर सरकारी रूग्णालयात दिल्या जाणाऱ्या उपचारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.