विषारी नागाशी झुंजला, आपले प्राण देऊन कुत्र्याने वाचविले मालकाचे प्राण

एका श्वानाने आपल्या मालकाचे प्राण वाचविण्यासाठी विषारी नागाशी झुंज देऊन स्वतःचे प्राण गमाविल्याची हृदयद्रावक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. 

Updated: Sep 29, 2015, 10:18 AM IST

कोलकता : एका श्वानाने आपल्या मालकाचे प्राण वाचविण्यासाठी विषारी नागाशी झुंज देऊन स्वतःचे प्राण गमाविल्याची हृदयद्रावक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. 

विमल घोष, यांचे नदी किनारी घर आहे. ते नेहमी प्रमाणे आपल्या घराच्या अंगणात काम करीत होते. अचानक मालकाच्या दिशेने जाणाऱ्या विषारी नागाला जॅक नावाच्या कुत्राने पाहिले. त्याने त्याच्यावर हल्ला केला. नाग आणि कुत्र्यामध्ये बराच काळ झुंज झाली. जॅकने त्या नागाला ठार मारले पण त्या विषारी नागाच्या दंशाने बिचाऱ्या जॅकला आपले प्राण गमवावे लागले. 

आपल्या मालकाचे प्राण या छोट्याशा कुत्राने वाचविले पण आपले प्राण देऊन.. विमल घोष यांना अजूनही विश्वास बसत नाही की आपला जॅक या जगात नाही आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.