जाणून घ्या... नोटा बदलण्याची नका बाळगू भीती!

काळापैसा आणि बनावट नोटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआय २००५ आधीच्या नोटा परत घेणार आहे. नोटा परत घेण्याची सुरूवात १ एप्रिल २०१४ पासून सुरू होणार आहे. मात्र तुम्हाला २००५ आधीच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत जावं लागेल. मात्र नोटा बदलण्याची धास्ती बाळगण्याची गरज नाहीय. कारण अशा नोटा दैनंदिन व्यवहारातून कोणत्याही बॅंकेत आल्यास त्या सॉर्टिंग यंत्राद्वारे आपोआपच बाजूला होणार आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 24, 2014, 01:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काळापैसा आणि बनावट नोटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआय २००५ आधीच्या नोटा परत घेणार आहे. नोटा परत घेण्याची सुरूवात १ एप्रिल २०१४ पासून सुरू होणार आहे. मात्र तुम्हाला २००५ आधीच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत जावं लागेल. मात्र नोटा बदलण्याची धास्ती बाळगण्याची गरज नाहीय. कारण अशा नोटा दैनंदिन व्यवहारातून कोणत्याही बॅंकेत आल्यास त्या सॉर्टिंग यंत्राद्वारे आपोआपच बाजूला होणार आहेत.
२००५पूर्वीच्या नोटा आता सॉईल नोटा म्हणून ओळखल्या जाणार असून त्या बाजूला काढून चलनातून रद्द होणार आहेत. ही प्रक्रिया बॅंकेतच होणार आहे. त्यामुळं आता व्यापारी उलाढालीतही नोट २००५ पूर्वीची की नंतरची हे पाहण्याची सध्या तरी कसरत करावी लागणार नाही.
२००५ पूर्वीच्या नोटा रद्द होणार, अशा आशयाच्या बातम्यांमुळं बँकामध्ये चौकशीसाठी गर्दी झालीय. लोकांच्या चित्रविचित्र शंकांना उत्तर देणं कर्मचाऱ्यांना अशक्‍य झालं. त्यातच रिझर्व्ह बॅंकेचा आदेश थेट बॅंकांपर्यंत पोचला नसल्यानं आदेशात नेमकं काय म्हटलं आहे हेही कळत नव्हते. पण अनेक बॅंकांत ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी या क्षणापासून २००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची गरज नाही, अशा नोटा दैनंदिन व्यवहारातून बॅंकांत आल्यास त्या आपोआपच बाजूला होतील, याची खात्री करून घेतली.
अशाच स्वरुपाचा एक आदेश ज्या शंभर, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर सिल्वर थ्रेड आहे त्या नोटा चलनातून काढल्या जाणार असा होता. त्या वेळीही गोंधळ उडाला होता. या नोटा व्यवहारात चालू आहेत. पण ज्या वेळी या स्वरुपाच्या नोटा बॅंकेत जमा होतात त्या वेळी आपोआपच त्या बाजूला निघतात. अशा सॉईल नोटा पुन्हा चलनात येत नाहीत. आता २००५ पूर्वीच्या नोटांबाबतीत हेच होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.