रामेश्वरम डॉ.कलामांसाठी होतं स्वर्गापेक्षाही सुंदर

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं रामेश्वरम या आपल्या मातृभूमीविषयी विशेष प्रेम होतं. आपल्या आत्मचरित्रात डॉ.एपीजे अब्दुल कलाम तामिळनाडूतील त्यांच्या जन्मभूमीविषयी लिहितात, माझं प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर रामेश्वरमधून मला रामनाथपूरमला हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आलं.

Updated: Jul 30, 2015, 10:37 AM IST
रामेश्वरम डॉ.कलामांसाठी होतं स्वर्गापेक्षाही सुंदर title=

मुंबई : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं रामेश्वरम या आपल्या मातृभूमीविषयी विशेष प्रेम होतं. आपल्या आत्मचरित्रात डॉ.एपीजे अब्दुल कलाम तामिळनाडूतील त्यांच्या जन्मभूमीविषयी लिहितात, माझं प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर रामेश्वरमधून मला रामनाथपूरमला हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आलं.

रामनाथपूरम हे 50 हजार लोकसंख्येचं शहर होतं, रामेश्वरम लहान गाव होतं, पण रामेश्वरम सारखी शांती येथे नव्हती, रामेश्वरमची मला खूप आठवण यायची, आणि काहीतरी कामानिमित्ताने रामेश्वरमला जाण्याची संधी आली, तर ती मी कधीच सोडत नव्हतो.

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना त्यांचं गाव किती आवडायचं, त्यांना तिथली शांतता कशी खूणावत होती, रामेश्वरमची त्यांनी किती आठवण येत होती, आणि रामेश्वरम म्हणजेच जन्मभूमीला जाण्याची संधी ते कधीच कसे सोडत नव्हते, यावरून 'जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी', म्हणजेच जननी, जन्मभूमी स्वर्गापेक्षाही सुंदर असते, हे एकदा पुन्हा स्पष्ट होतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.