'उबेर'कडून भारतीय विद्यार्थ्याला सव्वा करोडोंच्या पॅकेजची ऑफर

दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या (डीटीयू) एका विद्यार्थ्याला 'उबेर'ची लॉटरी लागलीय. 

Updated: Feb 17, 2017, 04:21 PM IST
'उबेर'कडून भारतीय विद्यार्थ्याला सव्वा करोडोंच्या पॅकेजची ऑफर

नवी दिल्ली : दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या (डीटीयू) एका विद्यार्थ्याला 'उबेर'ची लॉटरी लागलीय. 

बीटेकमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या सिद्धार्थला अमेरिकेची कंपनी 'उबेर'नं वार्षिक सव्वा करोड रुपयांचं पॅकेज ऑफर केलंय. सोबतच कंपनी चार वर्षांपर्यंत त्याला आपले शेअर्सही देणार आहे. 

दिल्लीच्या बसंत कुंजचा रहिवासी असलेल्या सिद्धार्थला उबेर टेक्नॉलॉजी कंपनीनं एक लाख दहा हजार यूएस डॉलर्स (जवळपास 73 लाख रुपये)चं मूळ वेतन आणि वर्षाला जवळपास इतकाच स्टॉक आणि शेअर्स तसंच अतिरिक्त लाभांश देण्याची ऑफर दिलीय. हा सगळा पगार जवळपास सव्वा करोडोंच्या आसपास पोहचतो. 

या ऑफरवर सिद्धार्थनं आपला आनंद व्यक्त केलाय. 22 वर्षांच्या सिद्धार्थचे वडील कन्सल्टंट म्हणून काम करतात तर आई फ्रिलान्स ट्रान्सस्क्रायबर म्हणून काम करते. या नोकरीसाठी सिद्धार्थला ऑक्टोबर महिन्यात सेन्ट फ्रान्सिस्कोमध्ये काम सुरू करावं लागेल. याच कंपनीत सिद्धार्थनं गेल्या वर्षी इंटर्नशिप केली होती. 

उल्लेखनीय म्हणजे, 2015 मध्ये डीटीयूचा विद्यार्थी चेतन कक्कड याला गूगलनं सव्वा करोड रुपयांचं वार्षिक पॅकेज दिलं होतं.