लक्ष द्या: सलग सरकारी सुट्यांमुळं बँकेचे व्यवहार २९पूर्वी पूर्ण करा

येत्या आठवड्यात बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळं सात दिवस बँकिंग व्यवहार थंडावणार आहेत. परिणामी 29 सप्टेंबरला बँकांचे व्यवहार मार्गी लावले नाही तर 7 ऑक्टोबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Updated: Sep 24, 2014, 11:19 AM IST
लक्ष द्या: सलग सरकारी सुट्यांमुळं बँकेचे व्यवहार २९पूर्वी पूर्ण करा   title=

मुंबई: येत्या आठवड्यात बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळं सात दिवस बँकिंग व्यवहार थंडावणार आहेत. परिणामी 29 सप्टेंबरला बँकांचे व्यवहार मार्गी लावले नाही तर 7 ऑक्टोबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

30 आणि 1 ऑक्टोबरला बँका अर्धवार्षिक कामांमुळं सुरु राहणार असल्या तरी ग्राहकांसाठी त्या बंद असतील. त्यानंतर 2 ऑक्टोबरला गांधी जयंती, 3 ऑक्टोबरला दसरा असल्यानं बँकांना सुट्टी आहे. 4 ऑक्टोबरला शनिवार असल्यानं सर्व बँका अर्धा दिवस खुल्या असतील. 5 ऑक्टोबरला रविवार असल्यानं आठवड्याची सुट्टी आहे. यंदा 5 ऑक्टोबरला बकरी ईद आहे. मात्र सरकारी अधिसूचनेनुसार बकरी ईदची सुट्टी 6 ऑक्टोबरला नमूद करण्यात आलीय.

त्यामुळं सोमवारी बकरी ईदमुळं बँका बंद राहतील. त्यानंतर 7 ऑक्टोबरला बँका नियमित सुरु होतील. मात्र आठवडाभराची प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी बराच वेळ जाणार आहे. चेक क्लिअरिंगसाठी सध्या किमान 48 तासांचा कालावधी लागतो. ही प्रक्रिया कॉम्प्युटराईंसड असली तरी बँकांचं कामकाजच थंडावणार असल्यानं चेक क्लिअरिंगसाठी किमान सहा दिवस लागतील.

तसंच 2 ऑक्टोबर आणि 3 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी सुट्ट्या असल्यानं एटीएममध्ये पैशांचा भरणा होणार नाही. त्यामुळं एटीएममध्येही खडखडाट राहण्याची शक्यता वर्तवली जातेय.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.