हिंदुंनी दोन नाही, पाच मुलांना जन्म द्यावा : सिंघल

Last Updated: Sunday, February 23, 2014 - 13:00

www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी हिंदूंनी कमीत कमी पाच मुलांना जन्म द्यावा, असं वक्तव्य केलं आहे. तसेच नरेंद्र मोदी यांना ३०० जागा मिळाल्या, तर राममंदिर बांधलं जाईल, असंही सिंघल यांनी म्हटलं आहे.
हिंदुंनी हम दो हमारे दो या सुत्रातून बाहेर येण्याची गरज आहे, कारण देशात मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू असल्याने, हिंदू अल्पसंख्यांक होतील, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
अशोक सिंघल यांनी पुन्हा आपला जुना सूर काढला आहे, यापूर्वीही अशोक सिंघल यांनी हिंदूंनी संख्या वाढवावी असं म्हटलं होतं.
सिंघल यांनी भोपाळमध्ये शनिवारी पत्रकारांशी बोलतांना हे वक्तव्य केलं, सिंघल म्हणालेस हिंदुत्वाला मोठा धोका आहे, यासाठी विहिपने संत समाजासोबत नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी प्रचार करण्याचा संकल्प केला आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांना १८० जागा मिळाल्या होत्या, त्यांनी पोखरण चाचणी केली. नरेंद्र मोदी यांना ३०० जागा मिळाल्या तर राममंदिर बांधलं जाईल आणि देशशक्तिशाली होईल.
देशाला अशा पंतप्रधानाची गरज आहे, जो परदेशी शक्तींशी लढेल आणि हिंदुत्वाला संपवालायला निघालेल्या शक्तीचा बिमोड करेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Sunday, February 23, 2014 - 12:59


comments powered by Disqus
Live Streaming of Lalbaugcha Raja