२८ लाख कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तीवेतनाचा लाभ

Last Updated: Thursday, August 28, 2014 - 17:24
२८ लाख कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तीवेतनाचा लाभ

नवी दिल्ली:  किमान निवृत्तीवेतनाचा लाभ २८ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. किमान मासिक निवृत्तीवेतनाची मर्यादा वाढवून एक हजार रुपये करण्यात आली आहे. 
तसेच, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्थेच्या म्हणजेच ईपीएफओच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी दरमहा किमान मर्यादा १५ हजार रुपये करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. 

सरकारने १९९५ च्या कर्मचारी निवृत्ती योजनेअंतर्गत एक हजार रुपयांचे निवृत्तीवेतन निश्चित करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाचा लाभ २८ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. सुमारे २८ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत 1 हजारपेक्षा कमी निवृत्तीवेतन मिळत होते. 

त्याचप्रमाणे, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्थेचे सभासद होण्यासाठी, आवश्यक किमान निवृत्तीवेतन मर्यादा दरमहा १५ हजार रुपये एवढी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे निवृत्त नोकरदार वर्गातील तब्बल ५० लाख कर्मचारी या कक्षेत येणार आहेत. 

‘किमान निवृत्तीवेतनाच्या मर्यादा निश्चित करण्यासोबतच सरकारने कर्मचारी अनामत आधारित विम्याची (ईडीएलआय) कमाल आश्वासित रक्कम तीन लाखांवर नेली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Thursday, August 28, 2014 - 17:24
comments powered by Disqus