पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथीसाठी होणार उघडे

राज्य पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. प्रत्यक्षात जेव्हा  तृतीयपंथी पोलीस सेवेत रुजू होतील तेव्हा तृतीयपथांना समान हक्क देणारं देशातील ते पहिले राज्य असेल.

Updated: Aug 25, 2016, 01:54 PM IST
पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथीसाठी होणार उघडे  title=

चेन्नई : राज्य पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. प्रत्यक्षात जेव्हा  तृतीयपंथी पोलीस सेवेत रुजू होतील तेव्हा तृतीयपथांना समान हक्क देणारं देशातील ते पहिले राज्य असेल.

तामिळनाडू सरकारने १३,१३७ पोलिसांच्या भरतीचे आदेश काढले आहेत. यासाठी तृतीयपंथी देखील अर्ज करू शकणार आहेत. नियम जे शैक्षणिक अर्हता, शारीरिक क्षमता आणि आरक्षणाच्या बाबतीत महिला प्रवर्गाला लागू असतात तेच निकष तृतीयपंथींना लागू असणार आहेत. 

प्रीतिका यशिनी यांनी महिला' म्हणून अर्ज केला होता. लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत असे सर्व टप्पे पार करून निवड झाल्यावर सन २०१३ मध्ये त्या पोलीस शिपाई म्हणून रुजूही झाल्या. पण वैद्यकीय चाचणीत त्या तृतीयपंथी असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याची निवड रद्द झाली. उच्च न्यायालयाने बडतर्फी रद्द करून त्यांना पुन्हा नोकरीत घेण्याचा आदेश दिला. आज प्रीतिका या पोलीस उपनिरीक्षक आहे.