... तरीही भाजपला विरोधी पक्षपद देणार - कुमार विश्वास

दिल्लीत निर्विवाद बहुमत स्पष्ट मिळवताना भाजप आणि काँग्रेसचा सुपडा साफ करताना 'आप'ने सकारात्मक राजकारण करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपला 3 जागा मिळाल्या तरी त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्याचे 'आप'ने संकेत दिलेत. याबाबत कुमार विश्वास यांनी याबाबतचे ट्विट केलेय.

Updated: Feb 10, 2015, 04:28 PM IST
... तरीही भाजपला विरोधी पक्षपद देणार - कुमार विश्वास title=

नवी दिल्ली : दिल्लीत निर्विवाद बहुमत स्पष्ट मिळवताना भाजप आणि काँग्रेसचा सुपडा साफ करताना 'आप'ने सकारात्मक राजकारण करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपला 3 जागा मिळाल्या तरी त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्याचे 'आप'ने संकेत दिलेत. याबाबत कुमार विश्वास यांनी याबाबतचे ट्विट केलेय.

भाजपला दिल्ली विधानसभेत सातपेक्षाही कमी जागा मिळाल्या तरी आम्ही त्यांना विरोधी पक्षनेतेपद देऊ, असे ट्विट करीत 'आप'चे नेते कुमार विश्वास यांनी आम आदमी पक्षाची विरोधकांबद्दलची सकारात्मक भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट केलेय.

कुमार विश्वास यांनी ट्विट केलय की, भारतात स्विकारार्हतेनेच लोकशाही चालते. भाजपला सातपेक्षा कमी जागांवर जरी विजय मिळाला तरीही त्यांना आम्ही विरोधीपक्षनेते देऊ.

भाजपने लोकसभेत जास्त जागा मिळविल्यानंतर सत्तेच्या नशेत राहण्यास सुरुवात केली. मात्र, लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर भाजपने काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावरही दावा करू दिला नाही. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदच न दिल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र, यंदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने वेगळा पायंडा घातला आहे. 

या नविन पायंड्यामुळे भाजपची गोची झाली आहे. लोकसभेत बहुमताने निवडून आलेल्या भाजपला दिल्ली विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदावर देखील दावा करता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तरीसुद्धा 'आप'च्या कुमार विश्वास यांनी भाजपला विरोधीपक्ष नेतेपद देण्याचे विधान जाहीर करुन भाजपवर अचून टायईमिंग साधले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.