डोक्याच्या मारामुळं जसवंत सिंह कोमामध्ये

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. काल रात्री ते आपल्या घरात पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

Updated: Aug 8, 2014, 04:35 PM IST
डोक्याच्या मारामुळं जसवंत सिंह कोमामध्ये title=

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. काल रात्री ते आपल्या घरात पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आता आयसीयूत दाखल करण्यात आलंय. डोक्याला लागलेल्या मारानंतर ऑपरेशननंतरही प्रकृती गंभीर. जसवंत सिंह आता कोमामध्ये गेल्याचं कळतंय. 

दिल्लीतील सेनेच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी त्यांच्या भेटीला हॉस्पिटलमध्ये गेलेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची फोनवरून चौकशी केली. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत जसवंत सिंहांनी बंडखोरी करत बाडमेरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. भाजपनं त्यांना पक्षातून बडतर्फ केलं होतं. 

जसवंत सिंहांनी अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि योजना आयोगाचं उपाध्यक्षपद भूषवलं होतं. 2004 मध्ये राज्यसभेत ते विरोधी पक्षनेते होते. तसंच कंदहार विमान अपहरण प्रकरणात त्यांनी तालिबान्यांच्या तावडीतून प्रवाशांना सुखरुपपणे सोडवलं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.