जुन्या नोटा देऊन 14 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार सरकारी बिलं

जुन्या नोटा देऊन सरकारी सेवांसाठीची बिलं भरण्याची मुदत आता 14 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Updated: Nov 11, 2016, 07:56 PM IST
जुन्या नोटा देऊन 14 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार सरकारी बिलं  title=

नवी दिल्ली : जुन्या नोटा देऊन सरकारी सेवांसाठीची बिलं भरण्याची मुदत आता 14 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आज मध्यरात्री ही मुदत संपणार होती, पण यापुढे सरकारी सेवांची बिलं 14 नोव्हेंबरपर्यंत भरता येतील, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

या निर्णयामुळे रेल्वेची तिकीट, सरकारी हॉस्पिटल्सची बिलं भरण्याची मुदत सोमवारपर्यंत वाढवणार आहे. केवळ वैयक्तिक आणि निवासी वापरासाठी ही सवलत असणार आहे. भविष्यातली बिलांची रक्कम आगाऊ भरण्यासाठी ही सवलत लागू असणार नाही.