बंगळुरु स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी - गृहमंत्री शिंदे

बंगळुरु स्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीचे गृहमंत्रालयाने आदेश दिलेत. तसंच या स्फोटानंतर कर्नाटक सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीय.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 17, 2013, 03:44 PM IST

www.24taas.com, बंगळुरु
बंगळुरु स्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीचे गृहमंत्रालयाने आदेश दिलेत. तसंच या स्फोटानंतर कर्नाटक सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीय.
बंगळुरुत भाजपच्या ऑफिसबाहेर झालेल्या स्फोटामागे दहशतवादी घातपात असण्याची शक्यता वर्तवली जातेय. या स्फोटात आयईडीचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. सकाळी पावणे अकराच्या सुमारास भाजपच्या ऑफिसबाहेर झालेल्या स्फोटात ८ पोलीस आणि १६ नागरिक जखमी झालेत.

मल्लेश्वर भागात बाईकवर स्फोटकं ठेवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. या स्फोटानंतर निवडणुकीच्या तोंडावर हा स्फोट झाल्यानं दहशतवादी घातपात असल्याची शक्यता वर्तवली जातेय.. स्फोटानंतर परिसर सील करण्यात आलाय. दरम्यान, दुसरा स्फोट झाल्याचे वृत्त पसरविण्यात आले होते. ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.